कोलंबो क्रिकेट क्लब मैदान (CCCG; सिंहला: කොළඹ ක්රිකට් සමාජ ක්රීඩාංගනය, तमिळ: கொலோம்போ கிரிக்கெட் கிளப் கிரௌண்ட்) हे कोलंबो, श्रीलंका येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते मुख्यत्वे स्थानिक प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांसाठी आणि दौऱ्यावर आलेल्या संघांच्या सराव सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षक क्षमता ६,००० इतकी असून येथील पहिला कसोटी सामना १९८४ साली खेळवला गेला. हे जागातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे. कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर आजवर तीन कसोटी सामने खेळवले गेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोलंबो क्रिकेट क्लब मैदान
या विषयातील रहस्ये उलगडा.