ऑलिंपिक स्टेडियम (बर्लिन)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऑलिंपिक स्टेडियम (बर्लिन)

मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४ व २००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →