एम.एच.पी.अरेना

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एम.एच.पी.अरेना

एम.एच.पी.अरेना (जर्मन: MHPArena) हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९० च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले. २०२३ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे एम.एच.पी.अरेना हे ठेवण्यात आले.

आजवर येथे १९७४ व २००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →