पनवेल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पनवेल

पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.

नवे पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुंबई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे, खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.

पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडी संस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारताच्या विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात, पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हे विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →