अहमदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. हे गुजरात राज्याची राजधानी आहे असेही म्हणले जाते. साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे. हे शहर अहमदशाहने स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. अहमदाबाद हे भारतातील एक महत्त्वाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. विक्रम साराभाई यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
क्रिकेट हा अहमदाबादमधील लोकप्रिय खेळ आहे; मोटेरा येथे नरेंद्र मोदी स्टेडियम नावाचे नवीन बांधलेले स्टेडियम १,३२,००० प्रेक्षक सामावू शकते, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनले आहे.
अहमदाबाद
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!