जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरून पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जबलपूर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.