इंदूर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इंदूर

इंदूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर हे मध्य प्रदेशाच्या भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. हे शहर इंदूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इंदूरला येतात. इंदूर हे शहर बरेच पुरातन आहे.



पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा माळवा या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हे युद्धात वीरगती प्राप्त झाल्यावर त्यांच्या सुनेने - महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्यादेेवींचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.

होळकरांचा राजवाडा इंदूरच्या मध्यात उभा आहे. इंदूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इंदूर एक औद्योगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →