जामखेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. दळण वळणाची दृष्ट्या एक महत्त्वाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. तीन जिल्ह्याचे हद्दी या तालुक्याला जोडून आहेत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ही जामखेडला ओळखतात.दिवंगत मेबल अरोळे यांनी सुरू केलेले CRHP प्रकल्प जामखेड तालुक्यात स्तिथ आहे. रेमेन मगेसेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे आणि त्यांची पत्नी मेबेल आरोळे यांची कर्मभूमी जामखेड आहे. जगातील कानाकोपऱ्यातून आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी, पर्यटक या प्रकल्पाला भेटी देण्यास जामखेड येथे येत असतात. जामखेड तालुक्यातील आठवडी बाजार प्रसिद्ध आहे, जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते, तसेच राज्यभरातील जनावरांच्या व्यापाऱ्यांची रेलचेल इथे असते. जामखेड येथे अन्न धान्याची मोठी बाजार पेठ आहे, जामखेडची ज्वारी संपूर्ण महाराष्ट्रात पसंत केली जाते. खर्डा हे तालुक्यातील ऐतिहास स्थळ आहे तेथे किल्ला व निजामाच्या काळातील गढी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जामखेड तालुका
यामागील विज्ञान आणि इतिहास.