पाटण हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे पाटण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
पाटण हे शहर जुन्या काळी अणहिलवाड या नावाने प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष दृष्टीस पडतात.
पाटण हे शहर येथे असणाऱ्या 'राणीनी वाव' या पुरातन स्थळामुळे तसेच पटोला साड्यांमुळे प्रसिद्ध आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या १०० रुपयांच्या नोटेवरदेखील या वावेचं चित्र आहे.
[१]
पाटण
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.