सातारा जिल्हा ( उच्चार ) भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्हा हा संत, महात्मे व योग्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो.
श्री.समर्थ रामदास स्वामी ह्यांचा सज्जनगड व श्री.गगनगिरी महाराज ह्यांचे जन्मस्थान असलेले पाटण हे देखील साताऱ्यात आहे.
सप्तर्षींपैकी एक वैदिक ऋषि व ब्रम्हदेवांचे मानसपुत्र (महर्षि) भृगु ऋषी ह्यांचे तपःस्थान व समाधी मंदिर साताऱ्यात आहे.
सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेनेमध्ये भरती होण्याची परंपरा जपतात.
सातारा जिल्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.