पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ''पुणे तिथे काय उणे '' प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहिल्यानगर जिल्हा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणे जिल्हा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?