सातारा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सातारा

सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर होय. सातारा हे नाव शहराला त्यासभोवतील असलेल्या ७ (सात) टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई ते सातारा हा १० पदरी (६ मुख्य मार्गिका + 4 सेवा मार्गिका) हमरस्ता दोन्ही शहरांना जोडतो. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते.

छत्रपती संभाजी राजेंचे पुत्र छत्रपती शाहू यांनी हे शहर वसवले, छत्रपती शाहूंच्या काळातच मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पसरले होते. हा मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळ समजला जातो. मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते.



सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता.



सातारा जिल्ह्यातील नद्या

कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →