नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर (जन्म : मुंबई, महाराष्ट्र, ५ ऑगस्ट १८६९; - बदलापूर (महाराष्ट्र), ५ मार्च १९६८) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.
ना.गो. चाफेकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.