मुधोजी दुसरे (१७९६ – १५ जुलै, १८४०) तथा अप्पासाहेब हे मध्य नागपूर संस्थानाचे राजे होते. हे १८१६ ते १८१८ पर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्य आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात, मराठ्यांच्या पराभव झाला अन् त्याबरोबरच मुधोजींची नागपूरातून हकालपट्टी झाली.
१८१६मध्ये दुसऱ्या रघुजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा परसाजी राजगादी पदावर झाला, परंतु लगेचच दुसऱ्या मुधोजींनी त्यांची हत्या करवून स्वतः राजा झाले.
याआधी १७९९ सालापासून नागपूर संस्थानात ब्रिटिश रेसिडेंट होता.
सत्तेवर आल्यावर मुधोजींनी नागपुरात ब्रिटिश तैनाती सैन्य ठेवण्याचे कबूल केले. याचबरोबर मुधोजींवर अनेक जाचक अटी लादण्यात आला. यांत पुण्यातील पेशव्यांशी कोणताही संबंध किंवा पत्रव्यवहारही करायला मनाई होती.
१८१७ मध्ये ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यावर अप्पासाहेबांनी ब्रिटिशांशी मैत्री असल्याचा आव भिरकावून दिला आणि पेशव्यांशी कराराची बोलणी सुरू केली.
नागपूरच्या सैन्याने ब्रिटिशांवर हल्ला केला आणि सीताबर्डीच्या येथील लढाईत आणि नंतर नागपूर शहराजवळच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतरच्या तहात बेरारचा उरलेला भाग आणि नर्मदा खोऱ्यातील प्रदेश ब्रिटिशांना देण्यात आले.
अप्पासाहेबांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले, परंतु काही काळानंतर ते पुन्हा कट रचत असल्याचे कळल्यावर त्यांना पदच्युत करून अलाहाबादला तुरुंगात पाठवले गेले. तेथे जात असताना मुधोजींनी आपल्याला नेणाऱ्या सैनिकांना लाच देऊन महादेव टेकड्यांमध्ये आणि नंतर पंजाबकडे पळ काढला. वाटेत जोधपूर येथे राजा मानसिंग यांनी ब्रिटिशांच्या हुकुमाविरुद्ध मुधोजींना आश्रय दिला आणि स्वतः ते जामीन राहिले.
अप्पासाहेबांचे जोधपूरमध्ये १५ जुलै, १८४० रोजी ४४ वर्षांचे असताना निधन झाले.
नागपूरचे दुसरे मुधोजी भोसले
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?