बख्त बुलंद शाह

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बख्त बुलंद शाह

बख्त बुलंदशहा राजगोंड घराण्याचे सर्वांत महान शासक होते. चांदा आणि मंडला हे शेजारील राज्ये त्यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले आणि नागपूर, बालाघाट, शिवनी आणि भंडारा या भागांमध्ये त्याने आपल्या राज्याचे विस्तार केले. खेरलाचे राजपूत राज्य सुद्धा त्यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले. सध्याचे छिंदवाडा आणि बैतूल जिल्हेही त्यांच्या नियंत्रणात होते. त्याने पवनी (भंडारा), डोंगरताल, सिवनी आणि कटंगी जिंकण्यासाठी सुद्धा युद्ध केले.

नागपूर शहराचा संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना ओळखले जाते. बख्त बुलंद शाह याने पूर्वी (राजापूर) बरसा किंवा बारास्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२ लहान गावांना एकत्र करून नागपूर शहराची स्थापना केली. १७०२ मध्ये बरीच शहरे व खेड्यांची स्थापना झाली. सर्व लहान गावे नागपूर शहरात विलीन झाली. आपल्या राज्याला योग्य आकार दिल्यानंतर त्यांनी लोकांना स्थायिक होण्यास उद्युक्त केले आणि त्यामुळे व्यापारात सुलभता आली. त्यांचे राज्य महान सुधारांच्या युगाचे प्रतीक आहेत. शेती, व्यापार आणि या क्षेत्राच्या वाणिज्यात बऱ्यापैकी प्रगती झाली. नागपूर किल्ल्यात त्यांनी मस्जिदीची बांधणी केली, ज्याने नागपुरात इस्लाम धर्म आणि संस्कृतीची सुरुवात केली.

बख्त बुलंद हा मुघल बादशहा औरंगजेब यांच्या सेवेत जाऊन, इस्लामचा स्वीकार करीत मोगल दरबारात देवगडचा राजा म्हणून अधिकृतपणे ओळखले गेला. मराठ्यांविरूद्ध मोगल युद्धाच्या वेळी बख्त बुलंद शहा नंतर मोगलांविरूद्ध उठाव केला आणि त्यांच्या प्रदेशाचा काही भाग हिसकावून घेतल्याचे कळले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →