अंबागड किल्ला

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आंबागड किल्ला (अंबागड किल्ला) हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे. तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्यास येथे पोचता येते. नागपूर पासून १०० किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंबागड नावाचा सुंदर पण अल्पपरिचित किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने मजबूतीकरण केल्यामुळे किल्ला उत्तम अवस्थेत आजही उभा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झालेले आहे. या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा रखरखाव करण्यात येत नाही व हे ठिकाण दुर्लक्षित आहे. गडावर अंबागडीया देव या गोंड, कोष्टी व इतर समाजाचे स्थान असून दरवर्षी येथे यात्रा भरत असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →