नाईक घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय कुटुंब असून राजकीय व सामाजिकदृष्ट्या या घराण्याला भारतीय व महाराष्ट्रातील राजकारणात विशेष महत्त्व आहे. इ.स. १९५२ पासून नाईक परिवारांचा पुसदवर प्रभाव आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पासून पुसदमध्ये या कुटुंबाचा प्रभाव आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व धवल क्रांती घडवून आणली तर , सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली.
सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रमुख मंत्रीपदासोबतच मुख्यमंत्री पद भूषविले. यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. या घराण्याचे सन २०१९ पर्यंत दोन सदस्य भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले आहे.
नाईक परिवार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.