जलसंधारण दिन 10 मे रोजी जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वत्र साजरा केला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरणे माजी मुख्यमंत्री व जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आखले. जलसंधारणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे 'पाणीदार नेता' म्हणून सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे. 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र त्यांनी दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची देशभर चळवळ सुरू केली. सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी प्रभावशाली कामगिरी बजावली. जलक्रांतीचा पाणीदार लढवय्या, 'जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरक कार्याचे वर्णन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जलसंधारण दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.