सुधाकरराव राजूसिंग नाईक (ऑगस्ट २१, १९३४; - मे १०, २००१) हे भारतीय राजकारणी आणि जागतिक ख्यातीचे जलतज्ञ , निर्भिड पत्रकार होते. महाराष्ट्राचा 'पाणीदार नेता' , आणि 'जलक्रांतीचे जनक' म्हणून सुधाकरराव नाईक देशभर ओळखले जातात. 'महाराष्ट्राचा पाणीदार नेता' , जलक्रांतीचा लढवय्या 'जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरक कार्याचे वर्णन केले आहे. "सरपंच , सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री , मुख्यमंत्री आणि राज्यपाल" असे लोकशाही व्यवस्थामधिल क्रमश: पहिल्या ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे ते एकमेव नेते मानले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधाकरराव नाईक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.