पाणी व्यवस्थापन

या विषयातील रहस्ये उलगडा.

आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन

सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. पाण्याचे थेंबनी थेंबाचे नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण चळवळीसाठी पुढाकार घेऊन विविध अभिनव योजना राबविल्या. नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा नाईक यांचा स्मृतीदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो. वाढत्या किमती व स्थानिकांचे विस्थापन पाणी व्यवस्थापनासाठी धरणे उभारणीला विरोध होतो आहे. मेधा पाटकर यांनी या संदर्भात जागृतीचे काम जगभरात केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात जलक्रांती घडवून आणणारे व जमिनीत पाणी मुरवणारे प्राचीन जोहड हा प्रकार पुरुज्जीवीत करणारे राजेंद्रसिंह राणा उर्फ जोहड बाबा या सारखे लोक काही प्रमाणात या प्रश्नाला उत्तर शोधत आहेत. तसेच जलसंधारण ही सुद्धा आजची गरज आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →