दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار دبي الدولي) (आहसंवि: DXB, आप्रविको: OMDB) हा संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील विमानतळ आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठा असलेला दुबई विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. एकूण प्रवाशांच्या संख्येबाबतीत व मालवाहतूकीबाबतीत दुबई विमानतळाचा जगात ६वा क्रमांक आहे. दुबई शहराच्या ४.७ किमी पूर्वेस अल गर्हूड भागामध्ये हा विमानतळ ७,२०० एकर क्षेत्रफळाचा. या विमानतळावर ३ टर्मिनल असून टर्मिनल क्र. ३ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी इमारत (अमेरिकेमधील पेंटॅगॉन खालोखाल) आहे. जानेवारी २०१५ अखेरीस दुबईमधून दर आठवड्याला १४० कंपन्यांची ८,००० विमाने उड्डाण करतात व २७० शहरांना विमानवाहतूक पुरवत. येथून एरबस कंपनीच्या एरबस ए३८० ह्या जंबोजेट विमानाची सर्वाधिक उड्डाणे होतात.
९०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा दुबई विमानतळ दुबईच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान करतो. दुबईच्या एकूण जी.डी.पी.चा २७ टक्के वाटा या विमानतळाकरवी येतो. २०२० अखेरीस हा आकडा ३७.५ टक्क्यांवर पोचेल असा अंदाज आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.