प्रा. दि.य. देशपांडे(जन्म : २४ जुलै, इ.स. १९१७, - ३१ डिसेंबर, इ.स. २००५) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवाद नावाची विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक हे मासिक सुरू केले. आपल्या पत्नी विदुषी मनू गंगाधर नातू यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांनी हे मासिक सुरू केले. बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वचिंतक म्हणून ते प्रसिद्ध होते. तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले. ते नाना म्हणूनही ओळखले जात. नागपूर विद्यापीठात सांकेतिक तर्कशास्त्र हा विषय सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांचे सहकारी, मित्र आणि तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्र. ब. कुळकर्णी यांनी 'सुधारक दि. य. देशपांडे' या आदरांजलीपर लेखात 'दियं' यांचे यथार्थ व्यक्तिचित्रण केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दि.य. देशपांडे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.