बुद्धिवाद

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात. बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism).

आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी.

बुद्धी हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे.

त्याची फोड करणे महत्त्वाचे आहे.बुद्+धि.

धि ही प्रत्येक प्राण्याकडे असते. बुद्धीच्या मार्गाने पंचेंद्रियाकडून आलेली माहिती एकगठ्ठा मेंदूत येते तिथे तिचे सूक्ष्म अलगीकरण (fragmentation) होऊन पुढील क्रिया केली जाते.हे सूक्ष्म अलगीकरण म्हणजे इंग्रजीमध्ये ratio. एखाद्या व्यक्तींची

बुद्धी ही या सूक्ष्म अलगीकरण करणाच्या क्षमतेवरून ओळखतां येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →