सांख्यदर्शनानुसार त्रिविध अंतःकरणाचे महत्त्व

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सांख्य या शब्दाच्या अनेक व्याख्या सांगितल्या आहेत. सांख्य म्हणजे ‘बुद्धि’. त्यापासून सांख्यज्ञान म्हणजे बुद्धिगम्य ज्ञान असा ही अर्थ होऊ शकतो. भगवद्गीतेत सांख्य हा प्रयोग ज्ञानमार्ग याच अर्थाने आला आहे. महाभारतात सांख्य ज्ञानाचा उल्लेख आहे. तेथे म्हणले आहे की ‘सांख्यज्ञानं प्रवक्ष्यामि परिसंख्यन्दर्शनं।’ परिसंख्यान हा शब्द विवेकज्ञान नंतर फेकून देणे किंवा त्याग करणे या अर्थाने आला आहे. सांख्य दर्शन म्हणते की, पुरुषाने आपण प्रकृतिपेक्षा भिन्न आहोत हे ज्ञान प्राप्त करून प्रकृतीला दूर करावे, तिचा त्याग करावा.

सांख्य दर्शनानुसार करणे एकूण तेरा प्रकारची आहेत. ‘क्रियते अनेन इति करणं’ अशी करण या शब्दाची व्याख्या करता येइल. करण हे करक म्हणजे क्रियेशी संबंध ठेवणारे असते. पाच ज्ञानेन्द्रिये, पाच कर्मेन्द्रिये आणि तीन अन्तःकरणे (मन, बुद्धि व अहंकार) अशी एकूण तेरा करणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →