अनुभववाद

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इंद्रियसंवेदना किंवा इंद्रियानुभव (Sense Experience) आणि बुद्धी (Reason) ही माणसाची दोन प्रमुख ज्ञानाची साधने आहेत किंवा मार्ग आहेत, असा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मानला जातो.

ज्ञान केवळ इंद्रियांनी होते, इंद्रियांना प्राप्त होणारा अनुभव म्हणजेच 'इंद्रियानुभव हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे', असा सिद्धान्त मांडणारी तत्त्वज्ञानातील विचारसरणी म्हणजे अनुभववाद होय. तिच्या विरुद्ध 'बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे', असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद होय. जे तत्त्ववेत्ते अनुभववाद स्वीकारतात ते अनुभववादी (Empiricist) मानले जातात. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात. कधी कधी केवळ प्रत्यक्ष-प्रमाणावर उभारलेल्या ज्ञानशास्त्रीय सिद्धांत संग्रहालाहि अनुभववाद म्हणून संबोधण्याची प्रथा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →