विज्ञान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.

विज्ञान ही एक पद्धतशीर व कठोर शिस्त असलेली ज्ञानशाखा आहे. विज्ञानात चाचणी करण्यायोग्य गृहितके तपासून ती स्वीकारण्या योग्य वाटल्यास या गृहितकाच्या आधारावर वास्तवात आणखी काय आढळू शकते याचे भाकित करून जगा बाबतचे ज्ञान विकसित केल्या जाते. आधुनिक विज्ञान सामान्यत: तीन प्रमुख शाखांमध्ये विभागले गेले आहे: नैसर्गिक विज्ञान (उदा., भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र), ज्यात भौतिक जगाचा अभ्यास करतात; सामाजिक विज्ञान (उदा. अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र) ज्यात व्यक्ती आणि समाज यांचा अभ्यास करतात; आणि औपचारिक विज्ञान (उदा. तर्कशास्त्र, गणित आणि सैद्धांतिक संगणक विज्ञान), ज्यात स्वयंसिद्ध प्रमेये आणि नियम यांच्या आधारावर औपचारिक प्रणालींचा अभ्यास केल्या जातो. औपचारिक विज्ञान हे वैज्ञानिक विषय आहेत की नाही याबाबत मतभेद आहेत कारण ते प्रायोगिक पुराव्यांवर अवलंबून नाहीत. उपयोजित विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत ज्या वैज्ञानिक ज्ञानाचा वापर व्यावहारिक हेतूंसाठी करतात, जसे की अभियांत्रिकी आणि आयुर्विज्ञान इत्यादि.

विज्ञानात ज्ञान निर्मिती होते तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हणले जात नाही -

उदा. अध्यात्म.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →