परामर्श (आयएसएसएन:ISSN 2320-4478) हे एक मराठी त्रैमासिक आहे. याची स्थापना डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांनी इ.स. १९७७मध्ये केली. या त्रैमासिकाचे आधीचे नाव 'तत्त्वज्ञान मंदिर' असे होते. नाव बदलण्यापूरवी ते पुणे विद्यापीठाचा तत्त्वज्ञान विभाग व अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र यांचे संयुक्त प्रकाशन होते. या नियतकालिकात तत्त्वज्ञानाशी संबंधित अशा कोणत्याही स्वरूपाच्या लिखाण असते. त्रैमासिकात योगदान देणाऱ्या लेखकांना लेखनस्वातंत्र्य असून त्यांचे संपादकाशी एकमत असणे आवश्यक नाही, असे सांगितले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परामर्श (मराठी नियतकालिक)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.