सुरेंद्र शिवदास बारलिंगे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे (२० जुलै, इ.स. १९१९ - १९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे स्वांतत्र्य सैनिक आणि महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतात आणि विदेशात ते तत्त्ववेत्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे तत्त्वचिंतन मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषेत आहे. तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी मराठीत तत्त्वज्ञानेतर लेखन केले आहे.

सुरेंद्र बारलिंगे यांचे वडील शिवदास कृष्ण बारलिंगे हे उत्कृष्ट वकील होते. ते संस्कृत, गणित, तत्त्वज्ञान, कायदा व खगोलशास्त्र यांचे विद्वान होते. प्रथम लो. टिळक आणि नंतर म. गांधी यांचे ते अनुयायी होते.. वामन आणि सुरेंद्र हे त्यांचे दोन मुलगे होते. वामन शिवदास बारलिंगे हे सुरेंद्र यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठे होते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →