दि सॉयसा स्टेडियम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डि सॉयसा पार्क स्टेडियम (पूर्वीचे टायरॉन फर्नांडो स्टेडियम) हे श्रीलंकेच्या मोराटुवा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे.[१] सध्या ते मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षकक्षमता १५,००० इतकी आहे आणि येथील पहिला कसोटी सामना १९९२ साली खेळवला गेला. मैदान १९४० साली खूले झाले आणि त्याला कसोटी दर्जा १९७९ साली प्राप्त झाला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी येथील कुटुंबांनी ५ एकर (२०००० चौ.मी.) जमीन अर्बन कौन्सिलला १९४० मध्ये देणगी म्हणून दिली आणि त्यामुळे ते नावारूपाला आले. कुटुंबाच्या दुसऱ्या एका सदस्याने २ एकर जमीन मैदानासाठी बाजारभावाने विकली. मैदानाचे नाव डि सॉयसा पार्क असे ठेवण्यात आले आणि ते मुख्यत: मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (MSC) आणि शालेय स्पर्धांसाठी वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →