श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७

या विषयावर तज्ञ बना.

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७

श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१७ मध्ये तीन टी२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑगस्ट २०१६ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामन्यांची स्थळे घोषित केली, त्यापैकी एक गीलाँग येथील कार्डिनिया पार्क तेथे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पार पडला.भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही उपलब्ध नसल्यामुळे, अ‍ॅरन फिंचला मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.. जानेवारी २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० मध्ये झालेल्या हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे, श्रीलंकेचा टी२० कर्णधार अँजेलो मॅथ्यूज दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता.

टी२० मालिकेआधी २० षटकांचा सराव सामना पंतप्रधान एकादश आणि श्रीलंकेदरम्यान खेळवण्यात आला. ॲडम व्होग्सने त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतप्रधान एकादश संघाचे नेतृत्व केले.

श्रीलंकेने मालिकेत २-१ असा विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →