एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम वर्गीय क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →