बाराबती स्टेडियम

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बाराबती स्टेडियम

बाराबती मैदान (उडिया: ବାରବାଟି ଷ୍ଟାଡିଅମ) हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत.

क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →