सेक्टर १६ मैदान (पंजाबी: ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ) हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे.
ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.
कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात सेक्टर १६ स्टेडियमवरून केली. जवळच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.
मोहालीमध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.
सेक्टर १६ स्टेडियम
या विषयावर तज्ञ बना.