विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड हे नागपूर मधील एक कसोटी क्रिकेटचे मैदान होते.
हे मैदान व्हिसीए मैदान म्हणून ओळखले जाते आणि मध्य विभागाच्या अधिपत्याखाली आहे. ह्या मैदानावरील पहिला सामना १९६९ साली खेळला गेला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान म्हणून ह्या मैदानाची जागा आता नवीन मैदान विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान ह्या मैदानाने घेतली आहे. सध्या हे मैदान विदर्भ आणि उत्तर प्रदेश क्रिकेट संघ वापरत आहे.
सुनील गावसकरने त्याचे एकमेव एकदिवसी शतक ह्याच मैदानावर क्रिकेट विश्वचषक, १९८७ दरम्यान न्यू झीलंड विरुद्ध केले.
१९९५ साली, भारत आणि न्यू झीलंड ५व्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, मैदानातील इस्ट स्टँडची भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यु झाला आणि ७० जण जखमी झाले होते.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान
थोडक्यात पण महत्त्वाचे.