भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे. मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे. अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण जेटली स्टेडियम
या विषयावर तज्ञ बना.