इडन गार्डन्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इडन गार्डन्स

इडन गार्डन्स (बंगाली: ইডেন গার্ডেন্স) हे कोलकाता, भारत येथील क्रिकेटचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघ आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे ते घरचे मैदान असून कसोटी क्रिकेट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. ६६,००० आसनक्षमतेनुसार ते भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून मेलबर्न क्रिकेट मैदाना खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. इडन गार्डनला "कलोसियमला क्रिकेटचे उत्तर" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते. क्रिकेट विश्वचषक, ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणाऱ्या लॉर्ड्सचा क्रमांक लागतो.

मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →