दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

या विषयावर तज्ञ बना.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय, ३-टी२० आणि ४-कसोटी सामन्यांसाठी मे आणि ऑगस्ट २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला. २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्व तयारी म्हणून एकदिवसीय सामने जून महिन्यात इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात आले. मॅन्चेस्टर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला जादा सुरक्षा देण्यात आली होती. इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ अशी आणि टी२० मालिका २-१ ने जिंकली.

एकदिवसीय मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेच्या संघांचे नॉरदॅम्पटनशायर आणि ससेक्स ह्या संघांविरुद्ध एकदिवसीय सराव सामने खेळविले गेले. त्यांचा लीस्टरशायर संघाविरुद्धचा ट्वेंटी२० सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखांशी मेळ न बसल्यामुळे रद्द करण्यात आला. कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ, वूस्टरशायर येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध तीन-दिवसीय सामन्यामध्ये सहभागी झाला.

कसोटी मालिकेसाठी, ज्यो रूटने पहिल्यांदाच इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, फाफ डू प्लेसीला पहिले मुल झाल्याने तो पहिल्या कसोटी मध्ये खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व डीन एल्गारने केले. इंग्लंडने कसोटी मालिका ३–१ अशी जिंकली, १९९८ नंतर मायदेशातील इंग्लंडचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच मालिकाविजय. मोईन अली ने २५२ धावा केल्या आणि २५ गडी बाद केले, त्यामुळे चार-सामन्यांच्या मालिकेमध्ये २५० धावा करून २५ बळी घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →