२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून सात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा करत आहे. इंग्लंडचा संघ डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात परतेल. कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील..
नोव्हेंबर २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी)चे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, ऑक्टोबर २०२१ मध्ये इंग्लंडचा पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर इसीबी आणि पीसीबी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला गेले. सकारात्मक चर्चेनंतर, पाच टी२० सामन्यांचा मूळ दौरा सात सामन्यांचा करण्यात आला. आधी टी२० सामने खेळवले जातील, तर ऑस्ट्रेलियातील २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर कसोटी सामने खेळवले जातील. एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मालिका होणार असण्याची पुष्टी केली. जुलै २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेरमन रमीझ राजा यांनी सांगितले की टी२० सामने लाहोर आणि कराचीमध्ये होण्याची शक्यता आहे. टी२० मालिकेचे तपशील २ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित करण्यात आले. कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आला.
टी२० मालिकेतील कराचीमधील सामन्यांत मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती दिसली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, कराचीतील पहिल्या चार सामन्यांना १,२६,५५० लोक उपस्थित होते.
१६ डिसेंबर २०२२ रोजी, पाकिस्तानच्या अझहर अलीने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३
या विषयावर तज्ञ बना.