आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३

आयर्लंड महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जात आहेत. एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते. आयर्लंडच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाने पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेत जाताना, पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या १८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांतून १२ विजयांचा विक्रम केला आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये दोन्ही संघांदरम्यान शेवटचा सामना झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →