दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे. या दौऱ्यावर दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे.
कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. सप्टेंबर २०२५ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
दोन्ही संघांसाठी ही मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील पहिलीच मालिका होती. पहिल्या कसोटीमध्ये ९३ धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर, केशव महाराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आणि कसोटी मालिका १–१ अशा बरोबरीत सुटली.
पहिल्या कसोटीदरम्यान पाकिस्तानच्या आसिफ आफ्रिदीने कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण करणारा तो तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू होता. त्याने पदार्पणातच बळींचे पंचक घेतले.
टी२० मालिकेमध्ये पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानने उर्वरित दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवत मालिका २–१ ने खिशात टाकली. डोनोव्हन फरेराची दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पहिलीच आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.
एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यामध्ये १-१ अशा बरोबरीनंतर, शेवटच्या निर्णायक सामना अगदी एकतर्फी झाला. पाकिस्तानने सामन्यात ७ गडी राखून सहज विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. मॅथ्यू ब्रीट्झकेची दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२५–२६
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.