द हिंदू (इंग्लिश: The Hindu) हे एक भारतीय इंग्लिश भाषेतील अग्रगण्य दैनिक आहे. याच्यावर द हिंदू ग्रुपच्या मालकीचे हक्क आहेत. ज्याचे मुख्यालय तामिळनाडू शहरातील चेन्नई येथे आहे. हे १८७८ मध्ये सुरुवातीला साप्ताहिक म्हणून सुरू झाले आणि १८८९ मध्ये दैनिक बनले. हे सर्वाधिक खप असणारे भारतीय वृत्तपत्रांपैकी तसेच टाइम्स ऑफ इंडिया नंतर भारतातील दुसरे सर्वाधिक प्रसारित इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र आहे. द हिंदू भारतातील ११ राज्यांमधील चेन्नई, कोइम्बतुर, बंगळूर, हैदराबाद, मदुरै, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुवअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगळूर, आणि तिरुचिरापल्ली अशा २१ ठिकाणांहून प्रकाशित होतं.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द हिंदू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?