हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे.
क्रिकेट खेळाडू चंद्रशेखरविषयीचा लेख येथे आहे.
कवी चंद्रशेखर यांच्याविषयीचा लेख येथे आहे.
चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती.
ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही.
त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते. मूडीज (अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी) यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती, तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थितीमुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकू नये, म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे दिली गेली म्हणुन प्रचंड टीका झाली होती. १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार अजूनच आर्थिक गर्तेच्या संकटात सापडले.
चंद्रशेखर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?