चेन्नई (जुने नाव मद्रास) (लिहिण्याची पद्धत) चेण्णै (स्थानिक उच्चार) (तमिळ्: சென்னை/चेण्णै) हे दक्षिण भारतातील एक मोठे शहर व भारतातील एक महानगर आहे. तसेच चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी देखील आहे. चेन्नई बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल तटावर वसले आहे. आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ चौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून स्थानिक वापरात असलेले चेन्नई असे करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेन्नई
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?