एन. राम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नरसिंहन राम ( ४ मे १९४५), एन. राम म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय पत्रकार आणि कस्तुरी कुटुंबातील एक प्रमुख सदस्य आहे, ज्यावर द हिंदू गट प्रकाशनाचे नियंत्रण आहे. राम हे १९७७ पासून द हिंदूचे व्यवस्थापकीय-संचालक होते आणि २७ जून २००३ ते १८ जानेवारी २०१२ दरम्यान ते मुख्य संपादक सुद्धा होते. फ्रंटलाइन, द हिंदू बिझिनेस लाइन आणि स्पोर्टस्टार या हिंदू समूहाच्या अन्य प्रकाशनांच्या अध्यक्षपदी सुद्धा राम यांनी काम केले होते. त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार आणि श्रीलंकेचा "श्रीलंका रत्न" पुरस्कार प्रदान केले आहेत.

२१ ऑक्टोबर २०१३ रोजी 'द हिंदू'च्या संपादकीय आणि व्यवसायातील बदलांनंतर एन. राम हे कस्तुरी अँड सन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि 'द हिंदू'चे प्रकाशक झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →