सध्या भारतात उच्च-गती रेल्वे (२०० किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त गती असलेली) नाही.
२०१४ च्या निवडणूकांपूर्वी, दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी उच्च-गती रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने भारतातील एक लक्ष लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांना उच्च-गती रेल्वेने जोडण्याचे वचन दिले. जेंव्हा , भाजपाने ही निवडणूक जिंकली तर हिरक चतुष्कोन प्रकल्पाचे आश्वासन दिले. त्याद्वारे चेन्नई,दिल्ली,कोलकाता व मुंबई ही शहरे जोडली जातील. नवीन सरकारसाठी हा प्रकल्प प्राथमिकतेवर ठेवण्यात आला. उच्च गती रेल्वेमार्गाच्या एक किमी बांधकामास सुमारे १०० ते १४० कोटी ईतका खर्च येतो जो सामान्य रेल्वे मार्गाच्या सुमारे १० ते १४ पट आहे.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उच्च-गती रेल्वेमार्ग बांधण्यास जपानची निवड केली. नियोजित रेल्वे ही महाराष्ट्रच्या मुंबई या राजधानीच्या शहरापासून अहमदाबाद या पश्चिमेस असलेल्या शहरापर्यंत धावेल. याची गती सुमारे ३२० किमी प्रति तास इतकी राहील व अंतर सुमारे ५०० किमी इतके. जपानच्या प्रस्तावानुसार, याचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू होऊन ते २०२३ मध्ये संपेल.यास सुमारे ९८० billion (US$२१.७६ अब्ज) इतका खर्च येईल. यासाठी जपान कमी व्याजाचे कर्ज देईल.
भारतातील उच्च-गती रेल्वे
थोडक्यात पण महत्त्वाचे.