त्रिएस्ते

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

त्रिएस्ते

त्रिएस्ते (इटालियन: Trieste; उच्चार ; स्लोव्हेन: Trst, जर्मन: Triest) ही इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्र किनाऱ्यावर व स्लोव्हेनिया देशाच्या सीमेवर वसलेले हे शहर इटलीमधील एक प्रमुख बंदर आहे.

मोक्याच्या स्थानी असल्यामुळे १९व्या शतकादरम्यान त्रिएस्ते हे ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना, बुडापेस्ट व प्राग खालोखाल) होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →