तांडेसामू चालो (tandesamu chalo) ही बंजारा तांड्याची एक सामाजिक चळवळ असूून तांड्याला गतिमान करणारे ते एक शाश्वत तांडावादी विचार आहे. जागतिकीकरणातही जन्माची नाळ कायम टिकवून ठेवणारा एक चिरंतन असा तांडाभिमुख विचार होय. बंजारा गोरमाटी भाषेतील या शब्दाचा मराठीत 'तांडयाकडे चला' असा शब्दशः अर्थ होत असून प्रख्यात विचारवंत एकनाथराव पवार नायक या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. 'स्मार्ट तांडा-ग्लोबल तांडा' ही नवी संकल्पना त्यांनी रुजवली. बंजारा समाजाच्या वस्तीस्थानास तांडा असे म्हणतात. साधारणपणे या वसाहती कमीतकमी दोनशे ते जास्तीत जास्त तीन हजार लोकसंख्ये पर्यंत असतात.
१९१६ मध्ये ग्रामीण भागातील समृद्धीला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी महात्मा गांधीजीनी 'खेड्याकडे चला' अशी जी हाक दिली होती, तिचे काही अंशतः साम्यता यात दिसून येते. परंतु मुख्य गावकुसापासून दूर असलेल्या आणि आपली स्वतंत्र ओळख आणि संस्कृती जपलेल्या वाडी तांड्याना या चळवळीचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर २०१६ पासून बंजारा समाजातील तरुणांनी सर्जनशील विचारवंत एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली तथा समाजातील जेष्ठ व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या स्वतंत्र चळवळीची सुरुवात झाली.
गाव आणि तांडा सबलीकरणाच्या या स्वतंत्र चळवळीमध्ये तब्बल शंभर वर्षाचा फरक असून शाश्वत तांडा सबलीकरणाची प्रक्रिया देखील साहजिकच उशिरा सुरू झाली.गावखेडी आणि तांडा हे ग्रामीण समाज जीवनाचे अंग जरी असले, तरी मात्र तांडा हे गावगाडया पेक्षा पुर्णतः भिन्न आहेत. तांडा प्रश्न, तांडा संस्कृती, तांडा आव्हाने आणि तांडा जीवन हे तांडयाचे वेगळेपण दर्शवितात.तथापि 'तांडेसामू चालो'('तांडयाकडे चला')ही संकल्पना स्वतंत्र व व्यापक आहे. शाश्वत तांडा विकासासाठी ही चळवळ उपयुक्त ठरणारी असून मान्यवरांचे याविषयीचे काही गौरवोद्गार आहे. "तांडेसामू चालो' ही एक लोकोत्तर संकल्पना आहे." असे बंजारा धर्मगुरू संत रामराव महाराज यांनी गौरवोद्गार काढले होते. तर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले कि, "भटक्या विमुक्तांना त्यांच्यामधील अभिनव कौशल्य आणि जिज्ञासा दाखवून वैचारिक विकास घडवून आणण्याचे काम 'तांडेसामू चालो'द्वारे होत आहे." बंजारा साहित्य सोबतच मराठी साहित्यामध्ये देखील 'तांडेसामू चालो' या लोकोत्तर विचाराचा उल्लेख होतांना दिसून येतो.
तांडेसामू चालो ही एक सर्जननशील तांडावादी विचारधारा असून तांडा सक्षमीकरणासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका या विचारप्रवाहाने निभावली आहे. 'खेेडयाकडेे चला' आणि 'तांडेसामू चालो' या दोन्ही संकल्पना , विचारधारा स्वतंत्र दृष्टीची असून स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहे. कारण गाव-खेडे आणि तांडा यात फार मोठ्या प्रमाणावर भिन्नता असते. तांडा संस्कृती देखील गावापेक्षा भिन्न असते. उपराजधानी नागपुरातील ग्रामीण तांडा मधून या चळवळीस सुरुवात झाली. ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या वसाहतीला तांडा असे म्हणतात. याच तांडयाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरीत करणारी एक अभिनव संकल्पना म्हणून 'तांडेसामू चालो' या संकल्पनेकडे बघितल्या जाते. वंचिताचा समग्र पुनरूत्थानाचा हा शाश्वत विचारप्रवाह तांडा जीवनात सर्जनशील विचारवंंत एकनाथ पवार नायक यांनी रूजवले. शाश्वत तांडा सक्षमीकरणासाठी चालना देण्यात हा विचारप्रवाह महत्वपूर्ण ठरत आहे.
तांडेसामू चालो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.