बंजारा भाषा ही बंजारा समाजाची मायबोली असून भारतभर बोलली जाणारी इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध आणि स्वतंत्र भाषा आहे.महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा खानदेश विभागात (Vidarbha Marathwada Khandesh Division) मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. यासह दक्षिण मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतासह पुर्वेकडील राज्यात सुद्धा बोलल्या जाते.
डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी , डॉ. राहुल सांस्कृत्ययान यांनी बंजारा भाषेला 'राजस्थानी प्रभाव असलेली बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'गोर बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलेल्या’ द लिंग्वीस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ अंतर्गत सुमारे 364 भारतीय भाषा व बोलींचा सर्व्हे (Survey of Languages And Dialects) करण्यात आला होता. यामध्ये पहिल्यांदाच बंजारा भाषेचा उल्लेख आलेला असून, ही भाषा चवथ्या शतकापासून बोलली जात असल्याचे नमूद केले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी सहिष्णूतेची एक मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ती मानवीय नातं जपणारी हृदयाची बोली आहे. निसर्गाच्या कुशीत बहरून धरती ,आकाश , चंद्र, तारे , पशू-पक्षी, नदी-नाले, झरे , वृक्ष-वेलीशी संवाद साधणारी ती निसर्गाची बोली आहेे" या शब्दात बंजारा भाषेचे वर्णन केले आहे.
बंजारा भाषा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?