बंजारा साहित्य (Banjara Literature) भारतीय वाड:मयीन चळवळीतील एक समृद्ध साहित्य आहे. बंजारा साहित्य हे देवनागरी लिपीतून आज मोठ्याप्रमाणात पहायला मिळते. आजवर अधिकतेने लोकसाहित्य, मौखिक साहित्याच्या स्वरुपाने बंजारा साहित्य जतन केल्याचे दिसून येते. ज्या प्रमाणे मराठी साहित्य , दलित साहित्य , ग्रामीण साहित्य , आदिवासी साहित्य , स्त्रीवादी साहित्य , श्रमीक साहित्य म्हणून पाहिले जाते , त्याचप्रमाणे बंजारा साहित्य म्हणून बघितले जाते. बंजारा साहित्याला स्वतः ची स्वतंत्र बंजारा भाषा , वैभवशाली संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. 'बंजारा साहित्याचा अस्तित्त्व त्यांच्या जीवनमूल्यात आणि तत्वज्ञानात आहे.' अखिल भारतीय स्तरावर बंजारा साहित्य संमेलन होतांना दिसून येते. ' थोर समाजसुधारक तथा आद्य इतिहासकार बळीरामजी पाटील ते नव्या काळातील सर्जनशील साहित्यिक , गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार एकनाथराव पवार ' हा बंजारा साहित्य, संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बंजारा साहित्य
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.