झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक

या विषयावर तज्ञ बना.

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक

झी सिने पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक हा हिंदी चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या महिला पार्श्वगायिकेला दिला जातो. विजेत्याची निवड ज्युरींकडून निवडक यादी मधून केली जाते आणि त्याची घोषणा वार्षिक झी सिने पुरस्कार सोहळ्यात केली जाते. पहिला झी सिने पुरस्कार १४ मार्च १९९८ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून, पुरस्कार सोहळा वेगवेगळ्या देशांमध्ये आणि खंडांमध्ये आयोजित केला जात आहे.

या श्रेणीतील पुरस्काराचे पहिले मानकरी लता मंगेशकर होत्या, ज्यांना दिल तो पागल है चित्रपटातील शीर्षक गीतासाठी हा पुरस्कार मिळाला. श्रेया घोषालने या श्रेणीत सर्वाधिक असे ८ झी सिने पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात २०१२ ते २०१६ पर्यंत सलग चार पुरस्कारांचा समावेश आहे. तिच्या खालोखाल अलका याज्ञिकला ३ आणि कविता कृष्णमूर्तीला २ वेळा पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →